22 September 2020

News Flash

नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करण्याची मागणी

शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा युक्तिवादही अर्जदाराने न्यायालयात केला.

| April 12, 2016 03:32 am

आर्थिक गैरव्यवहार आणि संपत्तीबाबतची माहिती जाणूनबुजून लपविल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी लाहोर उच्च न्यायालयात दाखल करून घेण्यात आली.

अर्जदार गोहर नवाझ सिंधू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहीद वाहिद यांनी सरकारी विधी अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेली हरकत फेटाळली आणि नवाझ शरीफ यांच्या परदेशात दोन कंपन्या आहेत याबाबतचे पुरावे सादर करण्याची अनुमती वाहिद यांनी सिंधू यांना दिली. या प्रकरणाची सुनावणी १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

पनामा दस्तऐवज जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नवाझ शरीफ यांच्या पुत्रांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचे आणि ब्रिटनमध्ये त्यांच्या दोन कंपन्या असल्याचे निदर्शनास आले असल्याने शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा युक्तिवादही अर्जदाराने न्यायालयात केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 3:32 am

Web Title: panama papers nawaz sharif
Next Stories
1 केरळमधील मंदिर आगप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
2 कमी खर्चातील सनक्यूब फेमटोसॅट उपग्रहाची निर्मिती
3 मसूदसह चौघांविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीससाठी एनआयएचे प्रयत्न
Just Now!
X