गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये बहिणीच्या नवऱ्यासोबत पळ काढल्याने एका १५ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ३५ वर्षीय व्यक्तीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील धर्मपुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, १५ वर्षांची मुलगी बहिणीच्या नवऱ्यासोबत पळवून गेल्याची माहिती मिळताच गावात पंचायत बोलवण्यात आली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून पंचायत बोलवण्यात आली होती. अल्पवयीन मुलीचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप मोठ्या बहिणीने केला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी पंचायतीच्या निर्णयानंतर मन्नवर तालुक्यातील ३५ वर्षीय व्यक्तीला मुलीला विकले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनेची चौकशी आणि तपास केल्यावर गुन्हा नोंदविला जाईल, असे सांगितले.

आणखी वाचा- कर्ज देणाऱ्या बँक मॅनेजरच्या प्रेमात पडली; दोन मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अल्पवयीन मुलीच्या पालकांनी ३५ वर्षीय मन्नवर येथील व्यक्तीला १.५५ लाख रुपयांना मुलीची विक्री केली. त्यातील ५ हजार रुपये आधीच पंचायत समितीच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानंतर जेवणासाठी आणखी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना कथितपणे काही रक्कम मिळाली,परंतु या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात अधिक तपास करत असून औपचारिक तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे जिल्हा पोलिस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह म्हणाले.

आणखी वाचा- दुर्दैवी! ६८०० रुपयांसाठी EMI एजंट घराबाहेर येऊन बसल्याने प्लंबरची आत्महत्या

दरम्यान, अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात आली असून जिल्ह्यातील चाईल्डलाईन संस्थेच्या अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन केले जात आहे. “आम्ही गावात गेल्यानंतर त्या मुलीची सुटका केली आहे. मुलीला शिकण्याची इच्छा आहे त्याचवेळी तिला तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत राहायचे आहे असा तिचा आग्रह आहे,” असे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.