News Flash

ठाकरेंसोबत २५ वर्ष राहून त्यांच्यावरच वैयक्तिक हल्ले; सुप्रिया सुळेंचं भाजपावर टीकास्त्र

सुषमा स्वराज आणि जेटलींनीही याचा विरोध केला होता

लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलेल्या पत्राचे पडसाद आज संसदेतही उमटले. पोलिसांना खंडणी वसूल करण्यास सांगितलं जात असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली. शून्य प्रहर काळात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात मांडलेल्या विमा संशोधन विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. विधेयकावर बोलण्यापूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या,”शून्य प्रहरात महाराष्ट्रातील मुद्द्यावर आठ लोकांनी भूमिका मांडली. पण आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की, हे दोन पक्ष कधीही वेलमध्ये येत नाहीत. जर आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत, तर आम्हाला बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. आमचा आवाज दाबला जाऊ नये. हे सरकार यू टर्न सरकार आहे. आज मला याच आश्चर्य वाटतंय की, २५ वर्ष शिवसेनेसोबत संबंध होते. तरीही उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीने वैयक्तिक हल्ले केले,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुषमा स्वराज आणि जेटलींनीही याचा विरोध केला होता

विमा दुरुस्ती विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,”हे विधेयक युपीए सरकारकडून मांडण्यात आलं होतं. तेव्हा सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी या विधेयकाला विरोध केला होता. मी केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारतेय की कशामुळे तुमचं मतपरिवर्तन झालंय? कारण चिदंबरम यांनी हे विधेयक मांडलं होतं, तेव्हा तुम्ही खूप जोर देऊन बोलले होते,”असा टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केली आहे.

महाराष्ट्रात पोलीस खंडणी मागायला लागलेत -बापट

परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उपस्थित करत पुण्याचे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. बापट यांच्याबरोबरच खासदार पुनम महाजन आणि नवनीत राणा यांनीही राज्य सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागलं आहे. गृहमंत्री खंडणी मागायला लागले आहेत. म्हणजे कुंपन शेत खायला लागली आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. सरकार भ्रष्ट होत चाललं आहे. त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेलं आहे. पोलीस खंडणी मागायला लागले आहेत. त्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत,” असं गिरीश बापट म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:43 pm

Web Title: param bir singh supriya sule criticised bjp and modi govt in lok sabha bmh 90
Next Stories
1 अमेरिकेच्या चाचणी अहवालानुसार AstraZeneca ची कोविड प्रतिबंधक लस ७९ टक्के प्रभावी
2 परमबीर सिंग नावाचं जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे – विनायक राऊत
3 काल संस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज करोना पॉझिटिव्ह आढळून आले; उत्तराखंडचे मुख्यमंत्री आयसोलेशनमध्ये
Just Now!
X