News Flash

मुलाच्या ऑनलाईन क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांनी टाकला पॉर्न व्हिडीओ

महापालिकेनं कडक कारवाईचा दिला इशारा

संग्रहित छायाचित्र

नजर हटी दुर्घटना घटी, असे फलक प्रवासाता रस्त्याच्या बाजूला लावलेले दिसतात. पण, दुर्घटना बाहेरच घडते असं नाही. कधी कधी मोबाईल हातात असताना दुर्लक्ष झालं, तर पार पश्चातापाची वेळ ओढावते. दिल्लीतही अशीच घटना घडली आहे. मुलाच्या ऑनलाईन क्लासच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वडिलांनी चक्क पॉर्न व्हिडीओच पाठवला. त्यामुळे मोठा गोंधळ तर झालाच पण, महापालिकेला कडक कारवाईचा इशारा देणारा आदेशच काढावा लागला.

हिदुस्थान टाइम्सनं या घटनेसंदर्भात वृत्त दिलं आहे. दिल्लीतील जहांगीरपुरीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेची माहिती दिली आहे. “मागील महिन्यात आम्हाला ऑनलाईन क्लासच्या पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक पॉर्न व्हिडीओ मिळाला होता. ही पॉर्न क्लिप विद्यार्थ्यांच्या नोंद असलेल्या मोबाईल क्रमाकांवरूनच पाठवण्यात आलेला होता. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्याच्या आईवडिलांना बोलावलं. त्यांनी असा कोणताही व्हिडीओ पाठवला नसल्याचं सांगितलं,” अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.

ऑनलाईन क्लासच्या या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मुलांच्या अभ्यासा व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी पाठवू नये, असं शिक्षकांकडून वारंवार सांगण्यात येतं, असं मुख्याध्यापकांनी सांगितलं. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या क्लासच्या ग्रुपवरच पॉर्न व्हिडीओ पाठवण्यात आल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. याची गंभीर दखल उत्तर दिल्ली महापालिकेनं घेतली. त्यानंतर अशा प्रकरणामध्ये दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेनं दिला आहे.

उत्तर दिल्ली महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे नरेला विभागातून ही तक्रार करण्यात आली होती. एका शाळेतून ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा देणारा आदेशच काढला आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास वेळ न दवडता आरोपी पालकांविरूद्ध गुन्हा दाखल करायला हवा,” असं महापालिकेच्या शिक्षण विभागानं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 4:30 pm

Web Title: parent shares porn video on childs class whatsapp group in delhi bmh 90
Next Stories
1 आपचा आमदार म्हणाला, “योगी की मौत सुनिश्चित हैं”; भाजपाकडून केजरीवाल यांना आव्हान, म्हणाले…
2 जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3 उत्तर प्रदेशातील रुग्णालयामध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं म्हणणाऱ्या ‘आप’च्या आमदाराला अटक
Just Now!
X