25 September 2020

News Flash

धक्कादायक: सुदृढ मुलासाठी आई वडिलांनी मुलीला ठार करून मृतदेह घरात पुरला

एका तांत्रिकाने सहा वर्षांच्या मुलीच्या आई वडिलांना असे करण्याचा सल्ला दिला होता. मुलीचा मृतदेह घरातच पुरलात तर तुमचे पुढचे होणारे मूल सुदृढ जन्माला येईल असे

आपले मूल सुदृढ जन्माला यावे म्हणून आई वडिलांनी केलेले कृत्य आई वडिल या नात्याला काळीमा फासणारे ठरले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका जोडप्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीला ठार केले. त्यानंतर तिचा मृतदेह घरातच पुरला. जन्माला येणारे मूल सुदृढ असावे म्हणून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एका तांत्रिकाने सहा वर्षांच्या मुलीच्या आई वडिलांना असे करण्याचा सल्ला दिला होता. मुलीचा मृतदेह घरातच पुरलात तर तुमचे पुढचे होणारे मूल सुदृढ जन्माला येईल असे त्याने या दोघांना सांगितले होते. अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर आणि किती भयंकर प्रमाणात रूजली आहेत हे दाखवणारी ही घटना आहे.

मुरादाबादमध्ये चंद्रपूर नावाचे गाव आहे त्या गावात ही घटना घडली आहे. तारा असे हत्या करून घरात पुरलेल्या मुलीचे नाव असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. ताराच्या मृतदेहाची ऑटोप्सी करण्यात आली आहे. ताराचा मृतदेह घरातच पुरण्यात आल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली त्यानंतर पोलिसांनी या घरी येऊन सगळी शहानिशा केली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ताराला पाच दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला पुरण्यात आले, तिचा मृत्यू गुदमरून झाला असे अहवाल सांगतो. ताराच्या आजीचीही चौकशी करण्यात आली. तेव्हा तिला घरातच पुरण्यात आल्याचे तिच्या आजीने सांगितले. ताराच्या आई वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2018 8:34 pm

Web Title: parents kill bury malnourished daughter in home for healthy child
Next Stories
1 जाणून घ्या करुणानिधी यांच्या खासगी आणि राजकीय जीवनाबद्दल काही खास गोष्टी
2 जाणून घ्या, करूणानिधींना का म्हणत होते ‘कलैगनार’
3 आमदार ते मुख्यमंत्री… द्रविडी नेत्याचा ६० वर्षाचा राजकीय प्रवास
Just Now!
X