26 October 2020

News Flash

मुलाचं इंग्लंडमध्ये निधन, आई-वडिल अडकले पुण्यात; अंत्यदर्शनासाठी इंग्लंडकडे मदतीची अपेक्षा

लॉकडाउनमुळे कुटुंबीयांना त्या ठिकाणी जाणं शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे.

प्रतिकात्मक फोटो

सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत खबरदरीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशात जाणारी विमानसेवाही गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यातील एका आई-वडिलांच्या समोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्यांच्या २३ वर्षीय मुलांच निधन झालं आणि लॉकडाउनमुळे त्यांना पुण्यातच अडकून राहावं लागलं आहे. अनेक प्रयत्न करूनही त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडणं शक्य झालं नाही. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता येत नसल्यानं मुलाचे कुटुंबीय भावूक झाले होते.

२३ वर्षीय सिद्धार्थ मुरकुंबी हा इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकेशायरमध्ये मार्केटिंगचं शिक्षण घेत होता. १५ मार्चपासून तो बेपत्ता होता होता. त्यानंतर एका नदी किनारी मृतावस्थेत त्याचं शरीर मिळालं असल्याची माहिती पोलिसांनी दिली, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्याचं कुटुंबीय हे सध्या पुण्यात आहेत. तसंच ते आपल्या मुलाचं अखेरचं दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. यादरम्यान त्याचं पार्थिव इंग्लंडच्या सरकारनं भारतात पाठवावं अशी भावूक मागणी त्यांनी केली आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आपल्या मुलाचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्वरित भारतात पाठवण्यात यावं, अशी मागणी सिद्धार्थच्या वडिलांनी केली आहे. आपल्या मुलाला अखेरची मिठी मारण्याचा अधिकार तरी त्याच्या आईला आहे, असं भावूक होऊन ते म्हणाले.

आत्महत्येची शक्यता
सुरूवातीच्या तपासानंतर त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सिद्धार्थच्या विद्यापीठात शिकणारा शिवम नावाचा एक मुलगा त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी त्याला भेटला होता. भेटीदरम्यान सिद्धार्थ कोणाशीही बोलत नव्हता हे पाहिलं. परंतु तो आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं, असं त्यानं बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:46 pm

Web Title: parents stuck in pune son died in united kingdom appeal uk govt for last glimpse coronavirus lockdown jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या.. सहजपणे, उन्हाळयात करोनाचा विषाणू मरणार का?
2 त्या एका अफवेमुळे ब्रिटनमधील नागरिकच मोबाईल टॉवर्सला लावत आहेत आग
3 अमेरिकेसमोर अभूतपूर्व संकट : करोनामुळे हाहाकार, १०८७१ जणांचा मृत्यू
Just Now!
X