फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एकाच वेळी सात ठिकाणी करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा फ्रान्समधील सर्वात भीषण हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्सचे पोलीस दल आणि दहशतवाद्यांमध्ये काही तास सुरू असलेल्या चकमकीत सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल्याची माहिती फ्रान्सच्या तपास यंत्रणेच्या सूत्रांकडून मिळत आहे.