News Flash

पॅरिस हल्ल्याच्या विरोधात सीरियात हवाई हल्ले सुरूच

रफाल व मिराज २००० विमानांनी रात्री साडेबारा वाजता हवाई हल्ले करून रक्का येथे सोळा बॉम्ब टाकले.

फ्रान्सच्या विमानांनी आज पुन्हा पॅरिस हल्ल्याच्या विरोधात आयसिसच्या उत्तर सीरियातील रक्का येथील छावण्यांवर हवाई हल्ले केले,

फ्रान्सच्या विमानांनी आज पुन्हा पॅरिस हल्ल्याच्या विरोधात आयसिसच्या उत्तर सीरियातील रक्का येथील छावण्यांवर हवाई हल्ले केले, तेथे या दहशतवादी संघटनेचे मुख्य नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र आहे.
सीरियातील रक्का येथे चोवीस तासात दुसऱ्यांदा हवाई हल्ले करण्यात आले असून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस आलाँद यांनी आयसिसवर हल्ले तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. रफाल व मिराज २००० विमानांनी रात्री साडेबारा वाजता हवाई हल्ले करून रक्का येथे सोळा बॉम्ब टाकले. अमेरिकी दलांशी समन्वय साधून हे हल्ले करण्यात आले असून फ्रान्सने त्याआधी टेहळणी मोहिमाही राबवल्या आहेत. फ्रान्सने सीरियात सप्टेंबरपासून हल्ले सुरू ठेवले असले तरी पॅरिसच्या हल्ल्यानंतर ते अधिक तीव्र करण्यात आले आहेत.
१० लढाऊ विमानांनी किमान २० बॉम्ब आतापर्यंत तेथे टाकले आहेत. फ्रान्स आता सीरियातील जिहादींविरोधात कारवाई तीव्र करणार असून ‘चार्लस द गॉल’ ही विमानवाहू युद्धनौका तैनात करणार आहे.

फ्रान्सचे युरोपीय समुदायाला पाठिंब्याचे आवाहन
पॅरिस : नृशंस दहशतवादी हल्ल्यांमुळे होरपळलेल्या फ्रान्सने युरोपीय समुदायातील राष्ट्रांना मंगळवारी अनपेक्षित साद घातली. ‘आयसिस’चा बालेकिल्ला असणा-या सिरीयन भूमीवर तिखट हवाई हल्ल्यांची सुरुवात करणा-या फ्रान्सला युरोपीय समुदायातील सर्वच्या सर्व म्हणजे २८ राष्ट्रांनी लष्करी कारवाईला पाठिंबा द्यावा, असे आवाहन फ्रेंच संरक्षणमंत्री ज्याँ युवेस ले ड्रियन यांनी केले आहे. त्यासाठी यापूर्वी कधीही वापरण्यात न आलेल्या युरोपीय युनियनच्या लिस्बन कराराचा दाखला फ्रान्सने दिला. युरोपीय समुदायातील कुठलेही सदस्य राष्ट्र लष्करी चढाईचे बळी ठरल्यास समुदायातील ऊर्वरित राष्ट्रांनी आपल्या सर्व शक्तीनिशी संबंधित राष्ट्राला मदत करावी, असे या करारात नमूद करण्यात आले आहे. सिरीया अथवा इराकमध्ये फ्रान्स राबवीत असलेल्या लष्करी मोहिमेमध्ये सहभागी होऊन अथवा फ्रान्सला इतर मोहिमांसाठी सहकार्य करून इतर राष्ट्रांना ही मदत करता येईल, असे ड्रियन यांनी म्हंटले आहे.

पुतीनही आक्रमक
मॉस्को : इजिप्तमध्ये घातपात घडवून पाडण्यात आलेल्या रशियन विमानात देशी बनावटीची स्फोटके वापरण्यात आली होती व ते दहशतवादी कृत्य होते, असे रशियाच्या एफएसबी या सुरक्षा संस्थेने म्हटले आहे. त्यानंतर या घटनेशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांबाबत माहिती देणाऱ्यास पुतिन यांनी ५० दशलक्ष डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 5:03 am

Web Title: paris attacks france bombs islamic state hq in syria hunts suspect who got away
Next Stories
1 पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अबौदचा शोध जारी
2 पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्याची गुप्तचर माहिती नव्हती – ओबामा
3 तामिळनाडूतील पावसाचा जोर ओसरला; मृतांची संख्या ७९
Just Now!
X