28 September 2020

News Flash

पॅरिस : रहिवाशी इमारतीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू; 28 जखमी

घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती

(PC : AFP/GETTY IMAGES)

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मंगळवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रहिवाशी इमारतीला ही आग लागली असून यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय 28 जण जखमी झाले आहेत.


घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आठ मजली इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अग्निशमन विभागाचेही 3 कर्मचारी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. पण या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 10:34 am

Web Title: paris building fire seven people reported dead
Next Stories
1 सेक्स टॉयद्वारे महिलेवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणीला अटक
2 पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटी लागू करा, भाजपाची मागणी
3 भाजपा म्हणते, “तो ‘सिली बॉय’ राहुल को धोपटेंगे ना”
Just Now!
X