News Flash

विरोधकांमुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत लटकले

आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर अध्यादेश आणण्याचा पर्यायही सरकारकडे आहे.

राज्यसभेत सर्व संमती न झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

राज्यसभेत सर्व संमती न झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊ शकले नाही. शुक्रवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या विधेयकावर सभागृहात एकमत होत नसल्याचे सांगत हे विधेयक आज सभागृहासमोर मांडता येणार नसल्याचे म्हटले. गुरूवारीच केंद्रीय कॅबिनेटने विधेयकातील सुधारणेस मंजुरी दिली होती. आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर अध्यादेश आणण्याचा पर्यायही सरकारकडे आहे. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यावरून काँग्रेसला घेरण्याची भाजपाला नामी संधी मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. दुपारी २.३० वाजता जेव्हा राज्यसभेची कार्यवाही पुन्हा सुरू झाली तेव्हा सभापतींनी हे विधेयक आज आणता येणार नसल्याचे स्पष्ट केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. अशात सरकारद्वारे याच सत्रात तिहेरी तलाक विधेयक संमत करण्याची इच्छा अपुरी राहिली आहे.

दुरुस्त्या काय?

* तिहेरी तलाक अजामीपात्र असला, तरी परिस्थितीनुरूप न्यायदंडाधिकारी पतीला जामीन देऊ शकणार.

* केवळ पत्नी किंवा तिच्या माहेरच्या कुटुंबातील आप्तांनाच पतीविरुद्ध तक्रार दाखल करता येणार. याआधी शेजाऱ्यांनाही हा अधिकार होता आणि त्यामुळे दुरूपयोगाची भीती होती.

* आता न्यायदंडाधिकाऱ्यांना पती आणि पत्नीत सामंजस्य निर्माण करता येणार. गुन्हा मागे घेण्याचा पती वा पत्नीला अधिकार बहाल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:07 pm

Web Title: parliament monsoon session rajya sabha defers triple talaq bill
Next Stories
1 ‘मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल’, सुषमा स्वराज यांचं ट्विटरवर भन्नाट उत्तर
2 दुसऱ्या इयत्तेतील मुलीवर शाळेत बलात्कार, इलेक्ट्रीशिअनला अटक
3 दहशतवाद्यांविरुद्ध लढणार महिला SWAT कमांडो, दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी
Just Now!
X