News Flash

संसदेचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी भगवंत मान दोषी

संसद आवारातील दृश्ये मान यांनी फेसबुकवर लाईव्ह केली होती.

भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनासाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देत आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे दारूच्या नशेत सभेत भाषण केल्याचा आरोप केला आहे.

मोबाइलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये फेसबुकवर लाइव्ह केल्याप्रकरणी संसदेच्या एका समितीने ‘आप’चे खासदार भगवंत मान यांना दोषी ठरवले आहे.
भगवंत मान यांच्या या कृत्यामुळे संसदेशी सुरक्षितता धोक्यात आल्याचा ठपका या समितीने ठेवला आहे. या चित्रीकरणामुळे संसद परिसरातील महत्वाची माहिती बाहेर जाऊन याचा वापर करून दहशतवादी संसदेवर हल्ला करू शकतात, असे मत समितीने नोंदवले आहे. ही समिती आपला अहवाल बुधवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवणार आहे. आपल्या मोबाइलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये भगवंत मान यांनी फेसबुकवर लाईव्ह केली होती. भगवंत मान यांनी केलेल्या संसदेच्या व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीत नऊ जणांचा समावेश होता. समितीला मुदतवाढही देण्यात आली होती. या कृत्याबद्दल मान यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी संसदेत उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला होता.

‘मला संसदेची सुरक्षा धोक्यात येईल असे काही करायचे नव्हते. मला फक्त येथील कामकाज कसे चालते याची माहिती द्यायची होती म्हणून मी ही क्लिप बनवली आणि फेसबुकवर अपलोड केली अशी प्रतिक्रिया मान यांनी दिली होती.

‘देशातील सर्व पक्ष हे आम आदमी पक्षाविरुद्ध आहेत. येथे द्वेषाचे राजकारण चालते त्यामुळे जाणूनबुजून आपच्या खासदारांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत केला होता. आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिले नव्हते ते मी तुम्हाला दाखवतो असे सांगत लोकसभेच्या कामकाजाची १२ मिनिटांची व्हिडिओ क्लिप भगवंत मान यांनी फेसबुकवर टाकली होती.
भगवंत मान यांनी केलेल्या कृतीमुळे संसदेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर संसदेचे सदस्य म्हणून मिळालेल्या विशेष अधिकारांवरही गदा आल्याची भावना अनेक सदस्यांनी यावेळी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 7:01 pm

Web Title: parliament security breach video bhagwant mann found guilty by the lok sabha committee
Next Stories
1 नोटाबंदीपूर्वी जम्मू काश्मीरमधील दहशतवाद बंद करावा, संजय राऊतांचा टोला
2 पाकिस्तानला कमी लेखू नका, पाकचे मावळते लष्करप्रमुख राहिल शरीफ यांची भारताला धमकी
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर; ओबामा, ट्रम्प, पुतीन यांना टाकले मागे
Just Now!
X