26 November 2020

News Flash

संसदीय समितीचे फेसबुक, ट्विटरला हजर राहण्याचे आदेश

वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक २०१९संबंधी संयुक्त समितीपुढे शुक्रवारी हजर राहावे, असे आदेश

(संग्रहित छायाचित्र)

माहितीची गोपनीयता आणि तिच्या संरक्षणाच्या मुद्यावर संयुक्त संसदीय समितीने फेसबुक आणि ट्विटर या बडय़ा समाजमाध्यमांना गुरुवारी समन्स बजावले.

वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक २०१९संबंधी संयुक्त समितीपुढे शुक्रवारी हजर राहावे, असे आदेश फेसबुकच्या भारतातील प्रतिनिधींना देण्यात आले आहेत. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी या समितीच्या अध्यक्ष आहेत. लोकसभा सचिवालयाने बजावलेल्या नोटिशीनुसार ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २८ ऑक्टोबरला समितीपुढे हजर राहावे लागणार आहे.

याच मुद्दय़ावर अ‍ॅमेझॉन व गूगलच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याबाबत समिती विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या समाजमाध्यमांना पाचारण करण्याच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे अनुचित व अन्यायकारक होईल, असे मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: parliamentary committee orders facebook twitter to be present abn 97
Next Stories
1 आता मोफत लशीचे वचन
2 रोजगारनिर्मितीच्या आश्वासनांची स्पर्धा
3 भारताकडून ट्विटरची कानउघाडणी
Just Now!
X