News Flash

बंदीचे लोण काश्मीर,राजस्थानमध्येही

जम्मू-काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाने गोमांसाच्या विक्रीवर बंदी घातली.

बंदीचे लोण काश्मीर,राजस्थानमध्येही

पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयाचे मुंबई व नवी मुंबईत तीव्र पडसाद उमटले असतानाच मांस आणि गोमांसाच्या विक्रीवर बंदीचे लोण गुरुवारी राजस्थान, जम्मू-काश्मीर व अहमदाबादमध्येही पसरले.

१७ सप्टेंबरला पर्युषणपर्व, १८ सप्टेंबरला जैनांचा सण ‘संवत्सरी’ आणि २७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या सणांनिमित्त मांस व मासे यांच्या विक्रीला बंदी घालणारा आदेश राजस्थान सरकारने जारी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाने गोमांसाच्या विक्रीवर बंदी घातली.
यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये, तसेच जमात-ए-इस्लामी व फुटीरवादी हुर्रियत कॉन्फरन्स यांसारख्या संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. या आदेशाला आव्हान देणार असल्याचे हायकोर्ट बार असोसिएशनने म्हटले आहे.
अहमदाबादमध्येही आठवडाभर गायी व बकरे यांसारख्या प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालणारा आदेश पोलीस आयुक्त शिवानंद झा यांनी काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2015 2:41 am

Web Title: paryashun ban hearts rajsthan kashmir and maharashtra
Next Stories
1 इस्लामी दहशतवाद्यांबाबतचे अहवाल वरिष्ठांनी बदलले
2 सौदी अरेबियाच्या दूतावासाला तपासात सहकार्य करण्याची विनंती
3 मणिपूर हल्ल्यातील सूत्रधाराला पकडून देणाऱ्यास रोख बक्षीस
Just Now!
X