30 September 2020

News Flash

एअर इंडियाच्या जेवणात सापडलं झुरळ

यासंदर्भात ट्विट करूनही एअर इंडियाने खेद व्यक्त केला आहे

एअर इंडियाच्या जेवणात झुरळ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या विमानात ही घटना समोर आली आहे. या प्रकाराबद्दल एअर इंडियाने दिलगीरीही व्यक्त केली आहे. एअर इंडियाने यासंदर्भातले एक ट्विटही पोस्ट केले आहे. आम्ही कायमच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो मात्र जो काही प्रकार समोर आला त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो अशा आशयाचा ट्विट करण्यात आला आहे.

नेमका काय प्रकार घडला?

रोहित राज सिंग हा प्रवासी भोपाळहून मुंबईला येणाऱ्या विमानात बसला होता. प्रवासादरम्यान त्याला नाश्ता म्हणून इडली-वडा सांबार देण्यात आले. यामध्ये झुरळ होते. ज्यासंदर्भातला फोटो त्याने ट्विट केला. ज्यानंतर एअर इंडिया प्रशासनाने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

आम्ही हा सगळा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. हे नेमके कसे घडले त्याची चौकशी आम्ही करतो आहोत. आम्ही आमचे प्रवासी रोहित राज सिंग यांच्या संपर्कात आहोत असेही ट्विट एअर इंडियातर्फे करण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:03 pm

Web Title: passenger finds cockroach in air india meal airline apologises
Next Stories
1 मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत गोव्याच्या विधानसभा उपाध्यक्षांनी केला खुलासा
2 धक्कादायक! जोडप्याने उबर ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे फेकले नाल्यात
3 मोदी नव्हे लोकशाहीच या देशाची ‘बिग बॉस’ : ममता बॅनर्जी
Just Now!
X