24 November 2020

News Flash

मोबाइल चार्ज करण्यासाठी पायलेटच्या कॉकपीटमध्ये जाण्याचा हट्ट केला आणि…

मुंबई विमानतळावर घडला हा विचित्र प्रकार

इंडिगोच्या विमानात घडलेला प्रकार

प्रकृती अस्वस्थ असल्याने किंवा काही तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना विमानातून उतरवल्याच्या बातम्या तुम्ही या आधी वाचल्या असतील. मात्र एका व्यक्तीने मोबाइल चार्जिंगसाठी पायलेटच्या कॉकपीटमध्ये जाण्याचा हट्ट केल्याने त्याला विमानातून उतरवण्यात आल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. मुंबईहून कोलकत्त्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात सोमवारी हा विचित्र प्रकार घडला.

एअर इंडिगोच्या ६ ई ३९५ विमानामधील एका प्रवाशाने मोबाइल चार्ज करण्यासाठी पायलेटच्या कॉकपीटमध्ये जाण्याचा हट्ट केला. अनेकदा समजून सांगितल्यानंतरही हा प्रवाशी विमानातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हता त्यामुळे अखेर त्याला विमानातून उतरवून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या गोंधळामुळे विमानाचे उड्डण १५ मिनिटे उशीराने झाले. सोमावरी संध्याकाळी ५:५५ उड्डाण घेण्याऐवजी विमानाने ६:१० वाजता उड्डाण घेतले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रवाशाची चौकशी सुरु केली असून अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.

विमानामध्ये पायलेटच्या कॉकपीटमध्ये कर्चमारी वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नाही अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिली. नियमांनुसार विमानाच्या उड्डाणामध्ये अडथळा ठरत असलेल्या या प्रवाशाला खाली उतरवण्याचा निर्णय पायलेटने घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 12:49 pm

Web Title: passenger tries to enter cockpit of indigos mumbai kolkata flight to charge his phone
Next Stories
1 प्रवाशाने शौचालय समजून उघडला विमानाचा दरवाजा
2 ‘क्यूँकी ये सडक किसीके बाप की नहीं?’ अक्षयच्या जाहिरातीमागील कल्पना या मराठमोळ्या तरुणीची
3 ‘आधार’ नसेल तरीही कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X