News Flash

लोअर बर्थसाठी भरावी लागणार जादाची रक्कम?

रेल्वे प्रवाशांना होणार भुर्दंड

रेल्वेचा दूरच्या पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रवाशांकडून कायमच लोअर बर्थला प्राधान्य असते. इतके दिवस तिकीट बुक करताना तसेच ऑनलाईन बुकींगमध्ये लोअर बर्थचा पर्याय नागरिकांना निवडता येत होता. मात्र आता या बर्थसाठीही जास्तीची रक्कम भरावी लागण्याची शक्यता आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून, यासाठी जवळपास ५० ते १०० रुपये जादा भरावे लागणार आहेत.

अनेक तासांचा प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतो. वरच्या बर्थवर जाण्यासाठी चढून जावे लागते. ते काहीजणांना त्रासाचे होऊ शकते. गरोदर स्त्रिया, वयस्कर व्यक्ती किंवा आरोग्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकडून लोअर बर्थला प्राधान्य असते. दिवसेंदिवस लोअर बर्थची मागणी वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकिकडे रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र नागरिकांकडून अशा पद्धतीने जादाचे पैसे आकारले जात आहेत. याचा नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासन अशी शक्कल लढवत असल्याचेही बोलले जात आहे. अशाप्रकारे भुर्दंड पडल्याने लोअर बर्थची मागणी कमी होण्याची शक्यता असून, ते बर्थ प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना देता येतील, असा रेल्वेचा मानस आहे.

अद्याप किती जास्त रक्कम भरावी लागेल ते स्पष्ट नसले तरीही रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती आहे. हे जादा शुल्क नेमके कधीपासून लागू होणार याबाबतही नेमकी माहिती अजून देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:12 pm

Web Title: passengers have to pay more for lower birth of railway
Next Stories
1 ‘केजरीवाल यांना ‘सरकार ३’ पाहण्यात रस, स्वत:च्या कार्यालयात जाण्यास वेळ नाही’
2 अर्णव गोस्वामींवर ‘टाइम्स नाऊ’चा काँटेंट चोरीचा आरोप, गुन्हा दाखल
3 महिलांनाही तिहेरी तलाक न स्वीकारण्याचा हक्क मिळू शकतो का?: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X