04 March 2021

News Flash

क्रूजवर पिकनीकसाठी गेलेल्या 1300 भारतीयांनी कापलं देशाचं नाक, परदेशी म्हणाले हे लज्जास्पद

या भारतीय कर्मचाऱ्यांमुळे क्रूज कंपनीला इतर परदेशी नागरिकांच्या तिकीटाची भरपाई द्यावी लागली आहे

Picture Credit : A Current AffairSource:Supplied

आपल्या देशाचे लोक जगभरात आपल्या सभ्य व्यवहारासाठी ओळखले जातात. असंही म्हणतात की, भारतीय जेथे जातात तेथे आपली छाप पाडतात, पण ऑस्ट्रेलियामध्ये क्रूजवर सुट्ट्यांसाठी गेलेल्या 1300 भारतीयांच्या व्यवहारामुळे देशाला नाचक्कीचा सामना करावा लागतोय.

एका तंबाखू कंपनीत काम करणारे 1300 भारतीय ऑस्ट्रेलियामध्ये रॉयल कॅरेबियन सी मध्ये क्रूजवर सुट्ट्यांसाठी गेले होते. 6 सप्टेंबर रोजी 1300 कर्मचाऱ्यांचं हे पथक तीन दिवसांसाठी येथे गेलं होतं. पण या भारतीय कर्मचाऱ्यांमुळे क्रूजवरील अन्य परदेशी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. या भारतीयांचा व्यवहार अत्यंत लज्जास्पद होता, त्यांनी तेथे प्रचंड गोंधळ घातला असा आरोप क्रूजवरील इतर परदेशी नागरिकांनी केला. इतकंच नाही तर या भारतीय कर्मचाऱ्यांमुळे क्रूज कंपनीला इतर परदेशी नागरिकांच्या तिकीटाची भरपाई द्यावी लागली आहे.

रोज बोलवायचे बार डांसर – news.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार हे भारतीय रात्री उशीरापर्यंत पार्टी करायचे, त्यांनी पार्टीमध्ये अर्धनग्न कपड्यांमधील बार डांसर बोलावल्या होत्या. त्या बार डांसरसोबत हे भारतीय असभ्य कृत्य करायचे. क्रूझवरील दारुचा टेबल आणि बफेवर या भारतीयांनी अक्षरशः ताव मारला. तीन हजार लोकांची क्षमता असलेल्या या क्रूजवरील अन्य यात्रेकरुंनी भारतीयांच्या कृत्यावर जोरदार टीका केली आहे. क्रूजवरील काही यात्रेकरुंनी ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपला वाईट अनुभव सांगितला. तीन दिवसांच्या यात्रेत भारतीय कर्मचारी रोज रात्री बार डांसर बोलवायचे. अत्यंत तोकडे कपडे घातलेल्या या बार डांसरसोबत हे भारतीय रात्री उशीरापर्यंत गोंधळ घालायचे. या भारतीयंनी त्या डांसरसोबत अभद्र व्यवहारही केला, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर फोटो आणि डांसचा व्हिडीओचंही चित्रीकरण त्यांनी फोनमध्ये केलं. या भारतीयांच्या कृत्याची तक्रार केल्यानंतर अखेर क्रूज कंपनीने इतर परदेशी यात्रेकरुंचे पैसे परत केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 3:08 pm

Web Title: passengers refunded money after 1300 indian men reportedly overran the ship royal caribbean cruise turns into 3 day burlesque party at sea
Next Stories
1 जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड
2 Video : तुम्ही ऑनलाइन फूड ऑर्डर करता? मग डिलिव्हरी बॉयचा हा प्रताप पाहाच
3 सुजुकीने भारतात लॉन्च केल्या दोन नव्या Off Road बाइक्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Just Now!
X