News Flash

पासपोर्टच्या फीमध्ये कित्ती टक्के कपात? जरुर वाचा!

पासपोर्ट आता हिंदी आणि इंग्रजी भाषेतही मिळू शकणार आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

पासपोर्टच्या फीमध्ये कित्ती टक्के कपात? जरुर वाचा..
पासपोर्टच्या शुल्कामध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. मात्र ८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांनाच ही सवलत मिळणार आहे. तसेच पासपोर्ट हा आता इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी ही महत्त्वाची घोषणा केली. पासपोर्ट अॅक्ट १९६७ ला ५० वर्षे पूर्ण झाल्याने ही सवलत देण्यात आली असल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. पासपोर्ट सेवा सुलभ व्हावी यासाठी देशात प्रत्येक ५० किलोमीटरनंतर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र आता नव्या सवलतीनुसार ६० वर्षे वरचे वय असलेल्या नागरिकाला पासपोर्ट काढण्यासाठी १५०० ऐवजी १३५० रुपयेच द्यावे लागणार आहेत. तत्त्काळ पासपोर्टसाठी ही सुविधा आहे की नाही हे अद्याप स्वराज यांनी स्पष्ट केलेले नाही.

काय आहे पासपोर्टचे शुल्क? कशी मिळेल सवलत?
जुलै २०१४ मध्ये केंद्र सरकारने पासपोर्टचे सेवा शुल्क १ हजारांवरुन १५०० रुपये केले होते. तर तात्काळ पासपोर्टची फी ही २५०० रुपयांवरुन ३५०० रुपयांवर नेली होती.
२०१४ पासून केंद्र सरकारने पासपोर्ट केंद्राची संख्या ७७ वरुन २५१ वर नेली. आता प्रत्येक जिल्ह्यात एक पासपोर्ट केंद्र सुरु करण्याचा सरकराचा मानस आहे
देशात येत्या काळात ८०० पेक्षा जास्त केंद्र उभारण्याची योजना केंद्राने आणली आहे.
देशभरातल्या टपाल कार्यालयांमध्ये पासपोर्ट ऑफिस उभारण्याची सरकारची योजना आहे

पासपोर्ट काढण्यासाठी लोकांना दूरवर जावे लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवी योजना आणली आहे. ज्या अंतर्गत ८०० पेक्षा जास्त पासपोर्ट केंद्रे सरकारतर्फे उभारण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2017 5:18 pm

Web Title: passport fee reduces for under 8 over 60 years
Next Stories
1 भांडणं लावण्यासाठीच मीरा कुमार यांना उमेदवारी, योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर आरोप
2 रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदाचा अर्ज भरताना संसदेत अवतरले ‘देखणे’ पाहुणे!
3 चर्चेसाठी भारताकडे भीक मागणार नाही, पाकिस्तानचं थेट मोदींनाच आव्हान
Just Now!
X