News Flash

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ‘या’ मतदार संघातून लढवणार लोकसभा निवडणूक

सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाच्या महिला खासदार करत आहेत.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेला गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा धक्का दिला आहे. Express photo by Dilip Kagda,

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होऊ शकतात. गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलेले पटेल हे १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात सहभागी होण्याची शक्यता आहे.

सध्या जामनगर मतदारसंघाच्या खासदार भाजपाच्या पूनमबेन मादम या आहेत. पटेल अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षात सहभागी होत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेते तिथे एक जाहीर सभा घेतील. गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य आहे. काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष गुजरातवर केंद्रीत केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपाला त्यांनी कडवी टक्कर दिली होती.

दरम्यान, २०१५ मध्ये हार्दिक पटेल हे जेव्हा पाटीदार आंदोलन करत होते. त्यावेळी लोक त्यांच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.

पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध केला होता. २०१५ मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 11:38 am

Web Title: patidar reservation leader hardik patel likely to join congress eyes on jamnagar seat
Next Stories
1 होर्डिंगवर मायावतींसोबत फोटो छापल्यास पक्षातून होणार हकालपट्टी, बसपचा नवा नियम
2 कर्जबाजारी अनिल अंबानींच्या कंपनीचे ‘टेक ऑफ’, गुजरात विमानतळाचे 648 कोटींचे कंत्राट मिळाले
3 लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण, स्थानिकांनी मध्यस्थी करत केली सुटका
Just Now!
X