News Flash

अरेरे ओशाळली माणुसकी! व्हेटिंलेटरवर असलेल्या २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्याने केला बलात्कार

वडिलांना लिहून सांगितली आपबिती

प्रातिनिधीक छायाचित्र

श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दाखल करण्यात आलेल्या एका २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला क्षयरोग (टीबी) असल्याचं निदान झाल्यानंतर व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याचवेळी एका कर्मचाऱ्यानं हे क्रूर कृत्य केलं. पीडितेनं वडिलांना लिहून घडलेली आपबिती सांगितली. गुरूग्राममधील एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, संशयित आरोपीची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हिंदुस्थान टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे. पीडित महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं गुरूग्राममधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिच्या क्षयरोगावरील उपचार सुरू होते. त्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

पीडिता काही आठवड्यापासून बेशुद्धावस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने हा सगळा प्रकार वडिलांना सांगितला. पीडितेचे वडील तिला भेटायला आल्यानंतर तिने बलात्कार झाल्याचं सांगितलं. पीडितेनं एक चिठ्ठी लिहून याची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सुशांत लोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त उषा कुंदू यांनी सांगितलं की, “पीडितेचे वडील तिला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयानं अंतर्गत चौकशी सुरू केली असून, संशयित आरोपीची ओळखही पटली आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही,” असं त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 8:13 pm

Web Title: patient raped by hospital staffer in icu bmh 90
Next Stories
1 FACT CHECK : मोदी-मोदी घोषणांनी पाकिस्तानची संसद दणाणली.. काय आहे सत्य?
2 आत्मनिर्भर भारत: अंतर्गत चॅटसाठी लष्कराने बनवलं साई अ‍ॅप
3 MI vs RCB सामन्यावर लावला जात होता सट्टा, पोलीस कारवाईत तिघांना अटक
Just Now!
X