भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी पाटणातील गांधी मैदानात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी बिहार पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेविरुद्ध प्रथम माहिती अहवाल(एफआयआर) दाखल केला आहे.
पाटण्यातील हल्ल्याचा इशारा होता
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या तहसिन अख्तरसह आणखी काही दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे. या बॉम्बस्फोटाप्रकरणी बिहार पोलिसांनी दाखल केलेला हा पहिला गुन्हा आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन मुजाहिद्दीनविरुद्ध एफआयआर दाखल केल्याने त्यांचा म्होरक्या यासिन भटकळ याला आता बिहार पोलीसांना ताब्यात घेता येणार आहे. त्यामुळे बिहार पोलिसांना बोधगया मंदिर परिसरातील बॉम्बस्फोटांचीही चौकशीही भटकळकडे करता येईल.
मोदी ‘कप्ताना’बरोबरच चर्चा करतील