News Flash

तीन संशयितांची चौकशीनंतर सुटका

पाटण्यामधील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी रांचीतून ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना चौकशीनंतर सोमवारी सोडून देण्यात आले.

| October 28, 2013 12:05 pm

पाटण्यामधील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी रांचीतून ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना चौकशीनंतर सोमवारी सोडून देण्यात आले. या स्फोटांमागील संशयितांचा शोध घेण्यासाठी रांचीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी रात्रीपासून छापे टाकण्यात येत आहेत.
स्फोटांनंतर तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीच हाती न लागल्यामुळे अखेर या तिघांना सोडून देण्यात आले. पोलीसांनी छापा टाकलेल्या एका ठिकाणाहून काळी पावडर, स्फोटके बनवण्यासाठी लागणाऱया वस्तू, प्रेशर कुकर आणि दहशतवादी विचारांना प्रवृत्त करणारे साहित्य जप्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:05 pm

Web Title: patna blasts detained persons released in ranchi
टॅग : Bomb Blast
Next Stories
1 गुजरातमधील लोकसभेच्या २६ पैकी २६ जागा जिंकण्याचे मोदींचे लक्ष्य
2 ‘नरेंद्र मोदी उद्धव आणि सुखबीर सिंह यांना ‘शहजादे’ म्हणतील का?’
3 पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन?
Just Now!
X