News Flash

पाटणा बॉम्बस्फोटप्रकरणी रांचीत चौघांना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारमधील पाटणा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेच्यावेळी गेल्यावर्षी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यात हैदर अली उर्फ

| May 22, 2014 04:41 am

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारमधील पाटणा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेच्यावेळी गेल्यावर्षी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यात हैदर अली उर्फ ब्लॅक ब्युटी हा म्होरक्या आहे.
अली याच्याशिवाय रांची येथून तौफिक अन्सारी, मोजिबुल्ला व नुमान अन्सारी यांना एनआयएने अटक केली. एनआयएने त्यांना पकडण्यासाठी पाच लाखांचे रोख इनाम जाहीर केले होते.
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पाटणा स्फोट प्रकरणाची उकल केली असून बिहारमध्ये गेल्यावर्षी अटक करण्यात आलेल्या यासिन भटकल याने  दिलेल्या माहितीच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:41 am

Web Title: patna rally blast case four including mastermind arrested
Next Stories
1 रशियाची आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
2 चीनमध्ये चाकूहल्ला सत्र सुरूच, सात जखमी
3 आशियाई देशांनी सुरक्षेसाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज- झी जिनपिंग
Just Now!
X