पवन हंस हेलिकॉप्टर लिमिटेडने गुरुवारपासून गुवाहाटी ते नाहारलागूनदरम्यान आपली प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा सुरू केली आह़े  मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर मे २०११ मध्ये या दुर्गम प्रदेशातील सेवा कंपनीने बंद केली होती़
२६ जणांची वाहतूक क्षमता असलेल्या एम- १७२ या नव्याकोऱ्या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवून आसामचे मुख्यमंत्री नबाम टुकी यांनी नाहारलागून येथील हेलिपॅडवरून या सेवेचा नव्याने शुभारंभ केला़  या छोटेखानी सोहळ्याला नागरी उड्डाण विभाग आणि ‘पवन हंस’चे अधिकारी, तसेच संबंधित विभागाचे मंत्री आणि आमदार आदींची उपस्थिती होती़.