05 June 2020

News Flash

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Paytmचा सेल; आयफोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसघशीत सूट

Apple iPhone 7 च्या खरेदीवर मोठी सूट

आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Paytm कडून ‘इंडिपेंडंस डे सेल’चे आयोजन केले आहे. Paytm चा हा सेल आठवडाभर सुरू राहणार आहे. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा सेल सुरू असेल. या काळात Paytm ग्राहकांना विशिष्ट उत्पादनांच्या खरेदीवर तब्बल ८० टक्क्यांची सूट किंवा २० हजार रूपयांची कॅशबॅक मिळू शकते. Paytm अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ अशा दोन्ही ठिकाणी ग्राहक या सेलचा फायदा घेऊ शकतात. या सेलमध्ये स्मार्टफोन व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ची खरेदी केल्यास ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.

यापैकी अॅपलच्या Apple iPhone 7 च्या खरेदीवर देण्यात आलेली सूट ग्राहकांचे सर्वात मोठे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. या सेलमध्ये Apple iPhone 7 च्या खरेदीवर साधारण १० हजारांची सूट मिळू शकते. तसेच या फोनवर ग्राहकांना ८,००० रुपयापर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. या आधीही पेटीएमने आयफोन SE वर १५% डिस्काउंटसह ३,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला होता. यामुळे त्याची किंमत २७,२०० वरुन १९,९०० वर आली आहे. सध्या आयफोन SE ची किंमत २२,९०० किंमत इतकी आहे. यानंतर आयफोन ६ व ६S वर ३,५०० रुपयापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

याशिवाय, या सेलमध्ये ग्राहकांना शिओमी एम आय मॅक्स २ हा फोन १६,९९९ रूपयांपर्यंत मिळू शकतो. तसेच या फोनच्या खरेदीरवर ग्राहकांना रिलायन्स जिओ फोरजीचा १०० जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. तर ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेला फॅबलेट २ ग्राहकांना १७,९९९ रूपयांमध्ये मिळू शकतो. आयफोनसोबतच लिनोव्हो, पॅनासॉनिक, व्हीवो, शाओमी एम आय मैक्स २, या स्मार्टफोनवर ही १०% कॅशबॅक तर एचपी, ऍपल यासारख्या बड्या ब्रँडवर २०,००० पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. याचबरोबर लॅपटॅाप, होम अप्लांयस, कपडे आणि अॅक्ससरीज यावर ही कॅशबॅक ऑफर्स असणार आहेत. मॅकबुक एयर १३ इंच ५१, ९९० रुपयांपर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार असून लिनोवो आइडिया पॅड ३२० वर ५००० पर्यंतचा कॅशबॅकPaytm देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2017 9:13 pm

Web Title: paytm announce independence day sale big discounts on iphone and electronic gadgets
Next Stories
1 युद्धासाठी २० हजार कोटी द्या; संरक्षण मंत्रालयाची केंद्राकडे मागणी
2 भाजपचा प्रत्येक शत्रू आमचा मित्र- ममता बॅनर्जी
3 यंदाच्या वर्षात उत्तर प्रदेशात सर्वाधिक जातीय दंगली; गृहमंत्रालयाचा अहवाल
Just Now!
X