News Flash

पीडीपी-भाजप सरकारचा १ मार्चला शपथविधी?

पीडीपी आणि भाजपने एएफएसपीए आणि कलम ३७० या प्रश्नांसह सर्व मतभेद मिटविले असल्याने काश्मीरमध्ये या दोन पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

| February 24, 2015 12:10 pm

पीडीपी आणि भाजपने एएफएसपीए आणि कलम ३७० या प्रश्नांसह सर्व मतभेद मिटविले असल्याने काश्मीरमध्ये या दोन पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा येत्या १ मार्च रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सात आठवडे चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात मंगळवारी येथे चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या आठवडाअखेर चर्चा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:10 pm

Web Title: pdp bjp government sworn in on march 1
टॅग : Pdp
Next Stories
1 मोदींच्या मतदारसंघात काँग्रेसचे शिबीर
2 ‘केजरीवालही रिटर्न’; ‘जंतरमंतर’वर अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार
3 धर्मांतरावर बंदी येईपर्यंत ‘घरवापसी’ सुरूच- योगी आदित्यनाथ
Just Now!
X