जम्मू काश्मीरमध्ये काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी पटेल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पुलवामा येथील राजापोरा येथे दहशतवाद्यांनी गुलाम नबी पटेल यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान जखमी अवस्थेत गुलमा नबी पटेल यांना रुग्णालयात नेलं जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजपोरा चौकात गुलाम नबी पटेल यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात इम्तियाज अहमद आणि बिलाल अहमद मिर हे दोघे खासगी अंगरक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गुलाम नबी पटेल याआधी पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षात (पीडीपी) होते.