26 November 2020

News Flash

तिरंगा ध्वजाबद्दलचं वक्तव्य मेहबुबांना महागात पडणार?; ‘पीडीपी’च्या तीन नेत्यांचा राजीनामा

भाजपाने देखील मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

संग्रहीत

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांना त्यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेले वक्तव्य, चांगलेच महागात पडत असल्याचं दिसत आहे. आज(सोमवार) त्यांच्या पक्षातील तीन नेत्यांनी मेहबुबा मुफ्तींवर नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

टीएस बाजवा, वेद महाजन व हुसैन ए वफा या तीन नेत्यांनी पीडीपीला सोडचिठ्ठी दिली आहे. मेहबुबा मुफ्तींची कृती व विशेषकरून त्यांनी केलेली वक्तव्यं आमच्या देशभक्तीच्या भावनेला दुखावणारी व आम्हाला अस्वस्थ करणारी आहेत. असं या नेत्यांनी एका पत्राद्वारे सांगितलं आहे.

दरम्यान, या अगोदर आज मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली होती. एवढच नाहीतर पीडपी कार्यालवर देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

१४ महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं होतं. ”जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता.”, असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. यावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 6:59 pm

Web Title: pdp leaders ts bajwa ved mahajan and hussain a waffa resign from the party msr 87
Next Stories
1 अमेरिकी हॉटेलनं अक्षरश: हाकललं, अनन्या बिर्लांना आला वर्णद्वेषी अनुभव
2 RAW प्रमुखांच्या भेटीनंतर नेपाळचे पंतप्रधान मवाळ भूमिकेत?, जुनाच नकाशा केला शेअर
3 पंजाब : दसऱ्यानिमित्त मोदींचा पुतळा जाळल्याने नवा वाद; भाजपा म्हणते…
Just Now!
X