News Flash

मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

त्या जम्मू-काश्मीरच्या १३व्या मुख्यमंत्री आहेत.

Mehbooba Mufti : पीडीपी व भाजप या दोन पक्षांमध्ये वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर राज्यात त्यांच्या आघाडीच्या सरकारचे पुनर्जीवन झाले आहे.

पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोरा यांच्याकडून राजभवनात मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्या जम्मू-काश्मीरच्या १३व्या मुख्यमंत्री आहेत. याशिवाय, त्यांना देशातील पहिल्या मुस्लीम महिला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला आहे.  राज्यपालांनी शनिवारी त्यांना पीडीपी-भाजप सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले होते.


मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गेल्या ७ जानेवारीला निधन होईपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली पीडीपी व भाजपचे सरकार सत्तेवर होते. त्या काळात या घटक पक्षांचा ज्या मुद्दय़ांवर वाद झाला, सज्जाद गनी लोन यांचा पीपल्स कॉन्फरन्स हा पक्षही घटक असलेल्या पीडीपी-भाजप आघाडीचे ८७ सदस्यांच्या विधानसभेत ५६ सदस्य आहेत. यात पीडीपीचे २७, भाजपचे २५ व पीपल्स कॉन्फरन्सचे २ आमदार असून इतर दोन अपक्षांचा आघाडीला पाठिंबा आहे. पीडीपी व भाजप या दोन पक्षांमध्ये वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर राज्यात त्यांच्या आघाडीच्या सरकारचे पुनर्जीवन झाले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 12:17 pm

Web Title: pdp mehbooba mufti sworn in as first woman cm of jammu kashmir
टॅग : Bjp,Mehbooba Mufti,Pdp
Next Stories
1 …तर ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचा गळाच कापला असता – रामदेवबाबा
2 THE PANAMA PAPERS : करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीय कंपन्या, अमिताभ, ऐश्वर्यासह अनेकांची नावे
3 पठाणकोटच्या तपास अधिकाऱ्याची हत्या
Just Now!
X