पीडीपी आणि बीजेपीमध्ये दोन महिने चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर अखेर आज जम्मू-काश्मीरला नवे सरकार मिळाले आहे. मुफ्ती मोहमद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जम्मू-काश्मीरचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, भाजप नेते निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्यासह सर्व मंत्र्यांना राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी शपथ दिली. याबरोबरच राज्यातील ४९ दिवसांची राज्यपाल राजवटही संपुष्टात आली आहे. राज्यात भाजप प्रथमच सत्तेवर आले आहे.