पिपली लाइव चित्रपटाचा सह दिग्दर्शक महमूद फारूकीला बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. नवी दिल्ली न्यू फ्रेंडस कॉलीनीत पोलीस ठाण्यामध्ये एका अमेरिकन महिलेने महमूद फारूकी विरूद्ध तक्रार नोंदविली आहे.
दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात एका अमेरिकन महिलेने महमूद फारुकी यांच्याविरोधात बलात्काराची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारुकींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मार्च २०१५ मध्ये फारुकी यांनी बलात्कार केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी फारुकीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने फारुकी यांना सहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या पिपली लाईव या चित्रपटाचे फारुकीने सह दिग्दर्शन व लेखन केले होते.