30 November 2020

News Flash

एन्रॉनच्या माजी अधिकाऱ्यांच्या शिक्षेत कपात

एकेकाळी वीजक्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या एन्रॉनचे साम्राज्य लयाला घालविण्यामागे हात असल्याच्या आरोपावरून २४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आलेले कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री स्किलिंग

| June 23, 2013 02:05 am

एकेकाळी वीजक्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या एन्रॉनचे साम्राज्य लयाला घालविण्यामागे हात असल्याच्या आरोपावरून २४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आलेले कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री स्किलिंग यांच्या कारावासाच्या शिक्षेत १० वर्षांनी कपात करण्यात आली आहे. सरकारी पक्षाशी करण्यात आलेल्या करारानुसार ही शिक्षा कमी करण्यात आली आहे.
जेफ्री स्किलिंग हे २००६ पासून कारावासात असून अमेरिकेतील डिस्ट्रिक्ट न्यायमूर्ती सिम लेक यांनी शुक्रवारी जेफ्री यांच्या शिक्षेत १० वर्षांची कपात करण्याचा आदेश दिला. सिम लेक यांनी शिक्षेत कपात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी पक्ष आणि स्किलिंग यांच्यात सुरू असलेले युद्ध समाप्त झाले.
न्यायालयाने शिक्षेत केलेली कपात आणि चांगल्या वर्तनापोटी स्किलिंग यांच्या शिक्षेच्या कालावधीत करण्यात आलेली कपात यामुळे आता स्किलिंग हे २०१७ मध्ये कारावासातून मुक्त होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 2:05 am

Web Title: penalty reduces of enrons officer
Next Stories
1 माहिती चोरीत अमेरिका व ब्रिटनचे साटेलोटे ?
2 मुस्लिमांच्या विवाहासंदर्भातील परिपत्रकावरून केरळमध्ये असंतोष डाव्या महिला, सांस्कृतिक संघटनांचा तीव्र विरोध
3 मराठी भाविकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
Just Now!
X