पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आज गुंतवणूक करण्यात आलेल्या एकूण रक्कमे अंतर्गत (असेट अँडर मॅनेजमेंट) पाच लाख कोटींचा टप्पा पार केल्याची घोषणा केली आहे. या आकड्यामध्ये सदस्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत १२ वर्षांच्या कालावधीत संयुक्तपणे योगदान दिले आहे.

याशिवाय नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) च्या सदस्यांच्या संख्येत देखील वर्षभरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शासकीय विभागांमधील ७०.४० लाख कर्मचाऱ्यांनी व अशासकीय विभागांमधील २४ .२४ लाख कर्मचारी या योजनेचे सदस्य झाले आहेत.

नियामक व पीएफआरडीए ग्राहक नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडून निर्गम प्रक्रियेची पद्धत आणि अन्य सेवा, विनंती कुठलीही अडचण न येता ग्राहकांना अनुकूल अशी बनवली जात आहे. ओटीपी / ई-साइन ऑन ऑनबोर्डिंग, ऑफलाइन आधार – आधारित ऑनबोर्डिंग, यासारख्या ग्राहक प्रमाणीकरणाच्या नवीन पद्धती नियमितपणे सादर केल्या जात आहेत. तसेच, केवायसी पडताळणीनंतर थर्ड पार्टी ऑनबोर्डिंग, ई-नॉमिनेशन, एनपीएस सदस्यांसाठी ई-एक्झिट इत्यादी सेवांचा देखील यात समावेश आहे.

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) चे अध्यक्ष सुप्रतिम बंड्योपध्याय म्हणाले की, असेट अँडर मॅनेजमेंट अंतर्गत पाच लाख कोटींचा टप्पा गाठणं ही एक मोठी उपलब्धी आहे. यावरून ग्राहकांचा पीएफआरडीए आणि एनपीएस वरील विश्वास दिसतो. आम्ही अद्यावत तंत्रज्ञान व तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांबरोबर एका मजबूत आणि विशेष प्रणालीवर काम केले आहे. या महामारीच्या काळात कॉर्पोरेट व वैयक्तिक दोन्ही स्तरांवर लोकांनी जाणले आहे की, निवृत्तीचे नियोजन केवळ बचत किंवा लाभ मिळवण्याचा पर्याय नाही. तर एक आर्थिक सुरक्षा देखील आहे. हेच कारण आहे की या आव्हानात्मक काळात एनपीएस नोंदणीत जवळपास १४ टक्के वाढ झाली आहे.

१० ऑक्टोबर २०२० पर्यंत एनपीएस आणि अटल पेन्शन योजने अंतर्गत ग्राहकांची एकूण संख्या ३.७६ कोटी व असेट अँडर मॅनेजमेंट ५ लाख ५ पाच ४२४ कोटी झाली आहे.