28 September 2020

News Flash

अहमदाबादमधील कोविड रुग्णालयाला आग; ८ रुग्णांचा मृत्यू

४० जणांना वाचवण्यात यश

गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आलं आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीचं कारण आद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार नवरंपुऱ्यातील कोविड डेडिकेटेड श्रेय रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. सध्या आगीचं कारणं स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:36 am

Web Title: people died in the fire which broke out at shrey hospital in ahmadabad this morning covid 19 center jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 लेबनॉन : स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; धक्कादायक सॅटेलाईट इमेजेसही आल्या समोर
2 राम सर्वांचाच!
3 आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास!
Just Now!
X