News Flash

जनता मोदी आणि भाजपला कंटाळलेय- गुलाम नबी आझाद

जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही.

देशातील जनता पंतप्रधान आणि भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी केली आहे. ते शनिवारी पाँडेचरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही. त्यांना मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे वाटत असल्याचे आझाद यांनी सांगितले. देशातील जनता पंतप्रधानांच्या कारभार आणि दीर्घकाळच्या प्रतिक्षेमुळे कंटाळली आहे. जनतेला अजूनही मोदींची भाषणे ऐकायला आवडतात. मात्र, जेव्हा पंतप्रधान आणि भाजपच्या कामगिरीचा विचार वेळ येते तेव्हा ती शून्य आहे, असे गुलाब नबी आझाद यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 4:30 pm

Web Title: people fed up with the prime minister bjp ghulam nabi azad
Next Stories
1 सेल्फीच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2 राहुल गांधींच्या तोंडी हाफीज सईदची भाषा- भाजप
3 कुपवाडमधील दहशतवादी चकमकीत महाराष्ट्रातील दोन जवान शहीद
Just Now!
X