करोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. नउ मिनिटांसाठी राष्ट्रपती भवनासह देशातली सर्व शहरांमध्ये दिवे लावण्यात आले. घरातले लाईट बंद करुन लोकांनी गॅलरी किंवा दारामध्ये दिवे लावले. पणती, मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च घेऊन लोक उभे होते. करोनाच्या संकटाशी देश सामना करतो आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र आम्ही सगळे एक आहोत ही भावना देशवासीयांच्या मनात आहे. तसेच करोनाविरोधात दिव्यांची आणि अवघ्या जनतेची एकजूट पाहण्यास मिळाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिवा पेटवून करोनाशी लढण्यासाठी अवघा एकवटला आहे हा संदेश दिला. त्यांच्या निवासस्थानी त्यांनीही दिवा पेटवला.


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही एक दिवा पेटवून करोना विरोधात लढण्यासाठी अवघा भारत सज्ज आहे हे दाखवून दिलं.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक दिवा करोनाविरोधात लावून अवघा देश करोनाशी लढा देण्यास एकवटला आहे हा संदेश दिला.

उत्तर प्रदेशचे मंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरातही त्यांनी ओमच्या आकारांची दिव्यांची आरास केलेली पाहण्यास मिळाली

गुजरातमधील अहमदाबादमध्ये अशा प्रकारे लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अनेक इमारतींमध्ये दिवे लावण्यात आले. त्याआधी लाईट बंद करण्यात आले आणि त्यानंतर अशाप्रकारे गो करोना गो अशी दिव्यांची रोषणाईही पाहण्यास मिळाली.

गाझियाबादमध्ये अशाच प्रकारची दृष्यं पाहण्यास मिळाली. स्वस्तिकाच्या आकारातले दिवे पेटवून आम्ही करोनाच्या विरोधात एकत्र आहोत असं इथल्या जनतेने सांगितलं.

अवघ्या देशभरात रोषणाई पाहण्यास मिळाली. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी एक दिवा पेटवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देशभरातून मिळाला हे पाहण्यास मिळालं.