पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसबरोरच भाजपा आणि काँग्रेसह अन्य राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तर, भाजपा व तृणमूल काँग्रेस यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

भाजपा नेते शाहननवाज हुसैन यांनी पंतप्रधान मोदींच्या आजच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर करोनाच्या मुद्यावरून निशाणा साधला. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली की, त्या राज्यात लोकांना मोफत करोना लशीकरण करतील. या मुद्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलतान शाहनवाज हुसैन ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

”केंद्रकाडून जेव्हापण काही निधी येतो, तेव्हा त्या तो आपलाच निधी असल्याचं सांगतात. जेव्हा करोनावरील लस येईल तेव्हा पंतप्रधान मोदी संपूर्ण देशाची काळजी घेतील. पश्चिम बंगालची लोकं आता करोनामुळे त्रस्त आहेत, मात्र अगोदरपासून टीएमसीमुळे जास्त त्रस्त आहेत” असं हुसैन यांनी म्हटलं आहे.