News Flash

भाजपाच्या लोकांना आपल्या पंतप्रधानांची लाज वाटायला हवी : राहुल गांधी

आम्ही मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांचा सन्मान करतो. मात्र, आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढणार आहोत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोध अंत्यत कठोर शब्दांत टीका केली आहे. भाजपाने अमेठी आणि रायबरेलीला काहीही दिले नाही, उलट जे होतं ते ओरबाडून घेतलं आहे. त्यामुळे इथं आता भाजापाचे लोक आले तर त्यांना सांगा की तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटायला हवी.


राहुल गांधी म्हणाले, इथं महामार्ग बनणार होता, मात्र झाला नाही. इथं फूडपार्क बनणार होतं ते ही झालं नाही. पंतप्रधान खोटं बोलतात, ते पहिल्यांदा देवाचं नाव घेतात आणि त्यानंतर खोटं बोलतात. त्यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत की, १५ लाख रुपयेही दिले नाहीत. त्यामुळे आता जर भाजपाचे लोक इथं आले तर त्यांना सांगा की, तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटायला हवी.

जर केंद्रात आमचं सरकार आलं तर अमेठी आणि रायबरेलीचा विकास होईल. लोकसभेसाठी काँग्रेस उत्तर प्रदेशात पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्ही मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांचा सन्मान करतो. मात्र, आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढणार आहोत. अमेठी आणि रायबरेलीशी माझं राजकीय नव्हे तर कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी इथल्या लोकांसाठी काम करीतच राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 3:29 pm

Web Title: people of bjp should be ashamed of their prime minister says rahul gandhi
Next Stories
1 तिरंगा यात्रा काढणाऱ्या विद्यार्थ्यांना अलीगड मुस्लीम विद्यापीठाची नोटीस
2 धक्कादायक ! हस्तमैथुन करत करायचा हत्या, ९० जणांची हत्या करणारा सीरियल किलर अटकेत
3 प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?; कपिल सिब्बलांनी दिले संकेत
Just Now!
X