News Flash

काश्मीरमधील लोकांना मोदींमध्ये वाजपेयींना पहायचं आहे – मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये वाजपेयींच्या 'काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत' धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे

मेहबूबा मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत’ धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी वाजपेयींनी 2003 मध्ये ‘काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत’ ही त्रिसूत्री निर्धारित केली होती. कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही वाजपेयी यांनी चर्चेची दारे बंद केली नव्हती.

यासोबतच मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पहायचं आहे असंही म्हटलं आहे. यावळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवलेल्या चर्चेच्या तयारीवरुन त्यांची बाजू घेतली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील रक्तपात थांबवायचा असेल तर वाजपेयींनी दाखवलेला मार्ग अवलंबला पाहिजे असं म्हटलं आहे.

‘वाजपेयींनी राजकीय प्रक्रियेला सुरुवात केली होती. आपण त्यांचे वारसदार आहोत. आपण कोणताही नवा मार्ग शोधण्याची गरज नाही. काश्मीरी जनतेसोबत चर्चा करण्याचा विषय असो अथवा पाकिस्तानसोबत सलोखा राहण्याचा…ना युपीएने त्यासाठी प्रयत्न केले ना एनडीए करताना दिसत आहे. दुर्देवाने दहशतवाद्यांनी याचा फायदा घेतला असून हिंसाचार वाढत चालला आहे’, असं मेहबूबा मुफ्तींनी म्हटलं आहे.

‘लोकांची निराशा झाली आहे कारण त्यांना नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पहायचं होतं. पण ते कधीच झालं नाही. त्यांना आमच्याकडूनही अपेक्षा होत्या’, असंही त्या म्हणाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीर सोबत घेऊन जाण्याबद्दल सांगितलं होतं. पण ते तसं खरंच तसं करत आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:24 am

Web Title: people of kashmir wanted to see vajpayee in modi says mehbooba mufti
Next Stories
1 लष्कराने मोडली दहशतवादाची कंबर, एका वर्षात 142 दहशतवाद्यांचा खात्मा
2 अमेरिकेची स्पर्धात्मकता धोक्यात
3 लालू, राबडींसह इतरांवर सक्तवसुली
Just Now!
X