News Flash

हिंसाचार घडवणारे राजकीय पक्षांचे लोक – राकेश टिकैत

"आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव"

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेला हिंसाचार घडवणारे राजकीय पक्षांचे लोक आहेत. त्यांचा शेतकऱ्यांचा आंदोलन बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.

“हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे,” असं राकेश टिकैत म्हणाले. दिल्लीत सुरु असलेले आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला यावर ते बोलत होते.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 4:50 pm

Web Title: people of political parties who perpetrate violence says rakesh tikait aau 85
Next Stories
1 दिल्लीतील वातावरणं बिघडण्याला अहंकारी सरकारच जबाबदार – संजय राऊत
2 शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा: दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
3 भारतातील एक हजारहून अधिक बंधारे धोकादायक; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Just Now!
X