देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO’s) करण्यात आला आहे. या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या नियतकालिक ‘श्रम शक्ती सर्वेक्षणा’तून (PLFS) ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के इतका आहे. आता यावरुनच काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला असून सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी #HowsTheJobs हा हॅशटॅग वापरून नोकऱ्या कुठे आहेत असा सवाल केला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांसह एका सदस्याने सोमवारी (दि.२८) दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या बेरोजगारीचा दर सध्या सर्वाधिक आहे. यावरुनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाही ‘नोमो जॉब’ असं ट्विट करत या अहवालाची आकडेवारी दाखवणारे काही फोटो ट्विट केले आहेत. तसेच या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ‘त्यांनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षांनंतर आज त्यांचे नोकऱ्या देण्यासंदर्भातील प्रगती पुस्तक समोर आले असून ही आकडेवारी म्हणजे राष्ट्रीय आपत्तीच आहे. ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी.’

तर काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरूनही या अहवालाच्या आकडेवारीचा आधार घेत मोदींवर टिका करण्यात आली आहे. ‘अवघ्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींने अर्थव्यवस्थेची दूर्वास्था केली अवघ्या पाच वर्षांमध्ये. त्यामुळेच आता ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी आहे. भारतामधील तरुणांना मोदीजींना एकच प्रश्न विचारायचा आहे, हाऊज द जॉब्स?’, असे ट्विट काँग्रेसच्या अकाऊण्टवरुन करण्यात आले आहे.

त्यांचे उत्तर

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी सिनेकलाकारांसमोर भाषण करताना ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमामधील हा संवाद वापरुन भाषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनीही आपल्या भाषणामध्ये हा संवाद वापरला होता. आता हाच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदींवर निशाणा साधत नोकऱ्यांचे काय हा प्रश्न उपस्थित केला आहे. #HowsTheJobs हा हॅशटॅग ट्विटवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. हा हॅशटॅग वापरुन अनेक काँग्रेस नेत्यांबरोबरच सामान्यांनाही मोदींना सवाल केले आहेत. पाहुयात असेच काही ट्विटस

बेरोजगारी कशीय? हाय सर…

नोकऱ्यांबद्दल विचारा

तुम्ही अडून राहा

हायच आहे नीट बघा

बेरोजगारी कशीय? हाय सर…

नोकऱ्यांबद्दल विचारा

तुम्ही अडून राहा

नोकऱ्या लो

चर्चा नको नोकऱ्या हव्यात

आम्हाला नोकऱ्या हव्यात आणि ते डायलॉगबाजी करतायत

प्रश्न आणि उत्तर

जोश हाय जॉब्स लो

काय विचारायलं हवं काय विचारतायत

दरम्यान नोटाबंदीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. त्यात सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे परिणाम झाले, त्यातील प्रतिकूल बाबींचा समावेश असल्याने हा अहवाल रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारने यावरुन सारवासारव केली होती. या सदस्यांनी आमच्याकडे कधीही त्यांचे आक्षेप व्यक्तच केले नाहीत, अशी भूमिका सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने घेतली होती.