News Flash

महाराष्ट्र, तामिळनाडूमधून आलेल्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ – येडियुरप्पा

जनतेला सरकारी नियमांचं पालन करण्याचं केलं आवाहन

महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं विधान मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केलं आहे. इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकालाही करोना विषाणूचा विळखा बसला आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल राज्यातील जनतेला संबोधित करत असताना येडियुरप्पा यांनी हे विधान केलं आहे.

राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींनी 5T ची स्ट्रॅटजी सुचवली आहे. ज्यात Trace, Track, Test, Treat and Technology अशा पाच टप्प्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. सुरुवातीला कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात होती. पण त्यानंतर महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे राज्यातील रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं येडियुरप्पा म्हणाले.

राज्यातील हॉटस्पॉट वगळता इतर भागात लॉकडाउन नसेल ही घोषणाही यावेळी येडियुरप्पांनी केली. यावेळी बोलत असताना येडियुरप्पांनी राज्यातील जनतेला सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं. बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, स्वच्छता यासारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सध्याच्या घडीला करोनाचा सामना करण्यासाठी हाच उपाय असल्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहनही येडियुरप्पांनी केलं. सोमवारी कर्नाटकात ३ हजार ६४८ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात १ हजार पेक्षा जास्त रुग्णांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 6:53 pm

Web Title: people who came from maharastra and tamil nadu added more covid 19 cases in karnataka says cm bs yediyuruppa psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत धान्य देणार : ममता बॅनर्जी
2 चीनच्या सीमेवर आता ‘भारत’ ड्रोनद्वारे असणार अधिक बारकाईने लक्ष
3 Coronavirus Fund: अर्थउभारीसाठी EU चं ७५० अब्ज युरोचं पॅकेज
Just Now!
X