News Flash

…त्या लोकांना NSG ची भिती वाटली पाहिजे – अमित शाह

ज्यांना देशामध्ये फूट पाडायचीय, शांतता नकोय, त्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सच्या कमांडोंची भिती वाटली पाहिजे.

ज्यांना देशामध्ये फूट पाडायचीय, शांतता नकोय, त्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सच्या कमांडोंची भिती वाटली पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी म्हणाले. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.

“आम्हाला संपूर्ण जगामध्ये शांतता हवी आहे. आपल्या दहा हजार वर्षाच्या इतिहासात भारताने कधीही कुठल्या देशावर हल्ला केला नाही. आम्ही सुद्धा कोणाला, आमच्या देशाची शांतता भंग करुन देणार नाही. जे कोणी सैनिकांचे प्राण घेतील, त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ज्यांना देशामध्ये फूट पाडायची आहे, शांतता भंग करायची आहे, त्यांना एनएसजीची भिती वाटली पाहिजे” कोलकात्यामध्ये एनएसजीच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सहन करायचा नाही हे आमचे धोरण आहे. एनएसजीची त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे” असे अमित शाह म्हणाले. उपकरण, साहित्याने नाही तर, शौर्याने युद्ध जिंकलं जातं असे शाह म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 4:11 pm

Web Title: people who want to divide country and disrupt peace must fear nsg says amit shah dmp 82
Next Stories
1 दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक; १३ डब्बे घसरले, तिघांचा मृत्यू
2 समजून घ्या सहज सोपं : अमेरिका-तालिबान करार काय आहे?
3 समोर जमलेली कमी गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना आठवला भारत दौरा