संसदेत स्वतंत्र तेलंगाणाच्या विधेयकावरून आज (गुरूवार) अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. आजचे संसदेचे वातावरण चाकू, पेपर स्प्रे आणि हाणामारी असे झाले होते. अखंड आंध्रप्रदेश समर्थकांनी संसदेत राडा केला या प्रकरणी १८ सदस्यांचे निलंबनही करण्यात आले. झालेल्या प्रकरणानंतर संसदेबाहेर मंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रया-
संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ-
काही सदस्यांनी संसदेत पेपर स्प्रे वापर केला. मी बघितले नाही पण, मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी चाकू आणि त्यासारखी धारधार शस्त्रेही संसदेत आणली होती. आज घडलेला प्रकार संसदेला लागलेाल कलंक आहे.

काँग्रेस नेते राजीव शुक्ला-
त्यांनी चक्क आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी-
आजची घटना लाजीरवाणी आहे. आपल्या संसदीय लोकशाहीची जगभरात प्रशंसा केली जात होती. आज आपल्या संसदीय कामकाजाला कलंक लागणारी घटना घडली आहे.

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी-
हे संसदेसाठी लज्जास्पद होते

तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंडोपाध्याय-
हे अविश्वसनीय आणि लज्जास्पद होते. असे कधीही कोणत्याही आपल्याही आणि जगातील कोणत्याही संसदेत झाले नव्हते

काँग्रेस खासदार सुखींदर रेड्डी-
आता संसदेतही अशा प्रकारच्या घटनांपासून बजावासाठी उपाय योजना करायला हवी. येथे आता काहीही होऊ शकते.

खासदार कामेश्वर भाटीया-
आज लोकशाहीचे मंदीर दूषित झाले. अशा वाईट घटनेला आकार देणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे.

काँग्रेस मंत्री भक्ता चरण दास-
त्यांनी दहशतवादी वृत्ती दाखविली आहे आणि आपल्या लोकशाहीचा अपमान केला.

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन-
तिरस्कारनीय प्रकार

नेमके काय घडले? वाचण्यासाठी क्लिक करा- तेलंगणा विधेयकावरून संसदेत चाकू,’पेपर स्प्रे’आणि हाणामारीसुद्धा!