News Flash

१२ ऑगस्टची रात्र दिवसाप्रमाणे उजळणार!

उत्तर गोलार्धातून हा उल्का वर्षाव चांगल्या पद्धतीनं पाहता येणार

संग्रहित छायाचित्र

खगोलविश्वातल्या अनेक गोष्टी आजही आपल्या आकलनाच्या बाहेर आहेत. आपल्या ब्रम्हांडाचं कोडं कधीही कोणाला सुटलेलं नाही. अशाच प्रकारची एक घटना ११-१२ ऑगस्टच्या मध्यरात्री होणार आहे. या ११ तारखेला रात्री १२ वाजल्यानंतर म्हणजेच १२ तारखेचा दिवस उजाडण्याआधी जी रात्र असेल ती रात्र दिवसाप्रमाणे उजळून निघणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या रात्री मोठा उल्का वर्षाव होणार आहे. खरंतर दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान एकदा किंवा दोनदा उल्कावर्षाव होतो. मात्र यावेळी होणाऱ्या वर्षावातल्या उल्का या आकारानं मोठ्या आणि जास्त चकाकणाऱ्या असतील. तसंच प्रत्येक तासाला अशा साधारण २०० उल्का पृथ्वीवर कोसळतील ज्यामुळे आकाश उजळून निघेल. उत्तर गोलार्धातून हा उल्का वर्षाव सगळ्यात चांगल्या पद्धतीनं पाहता येईल असंही खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

नासानंही यासंदर्भातली माहिती प्रसारित केली असून यावेळचा उल्का वर्षाव हा मोठा आणि जास्त तेजस्वी असणार आहे असं म्हटलं आहे. उल्का वर्षाव म्हणजे आकाशातून अनेक उल्का पृथ्वीवर पडतात. या उल्का म्हणजे तुटणारे तारेच असतात. या खाली पडत असताना त्यांचा जो अंश पृथ्वीवर पडतो त्याला उल्कापिंड असं म्हणतात. आकाशात आपण अशा अनेक उल्का पाहू शकतो. ११ ऑगस्टच्या रात्री जो उल्का वर्षाव होणार आहे त्यामुळे आकाश उजळून निघणार आहे म्हणूनच त्यादिवशीची रात्रही प्रकाशमय असेल असं मत खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 9:30 pm

Web Title: perseid meteor shower 2017 ulka pind india no darkness night 11th 12th august 2017
Next Stories
1 हाफिज सईदचा राजकारणात प्रवेश; मिल्ली मुस्लिम लीगची स्थापना
2 मेधा पाटकर आणि उपोषणकर्ते अटकेत, पोलिसांकडून बळाचा वापर
3 काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्न; जयराम रमेश यांची स्पष्टोक्ती
Just Now!
X