News Flash

आंबटशौकीनाला तिने व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरुन घातला हजारोंचा गंडा

महिन्याभरापूर्वीच झाली होती मैत्री

बंगळूरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिन्यापूर्वीच त्या मुलाची एका मुलीशी मैत्री झाली होती. असं असतानाही त्या मुलानं मुलीला आपला व्हॉट्सअ‍ॅप नंबर दिला आणि त्यानंतर जे झालं त्यानं मुलाला धक्काच बसला. एका मुलीनं त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर घेऊन त्याला व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यात सांगितलं. त्यानंतर काही तरूणांनी तो त्याचा व्हिडीओ असल्याचा दावा करत हजारो रूपयांना गंडा घातला.

एका अज्ञात मुलीशी आपली महिन्याभरापूर्वीच ओळख झाल्याची माहिती बंगळुरूमध्ये राहणाऱ्या पीडित मुलानं पोलिसांना दिली. काही दिवसांत त्यांची मैत्रीही वाढली. तसंच आपण केरळ राहत असल्याचं म्हणत एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याचंही ती म्हणाली. करोना व्हायरसच्या संकटामुळे त्याच्यासोबत पीजी म्हणून राहणारा मुलगाही त्याच्या गावी गेल्यानं पीडित मुलगा एकटाच आपल्या घरी होता.

त्याचदरम्यान दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मुलाला विनाकपड्यात पाहण्याची इच्छा असल्याचं त्या मुलीनं सांगितलं. पहिल्यांदा त्या मुलानं त्या गोष्टीसाठी नकार दिला. परंतु नंतर त्या मुलीनंही तो करेल तसंच आपणही करणार असल्याचं त्याला सांगितलं. “त्या मुलीवर विश्वास ठेवून मी तिला व्हिडीओ कॉल केला आणि माझे कपडे काढले. परंतु काही वेळातच त्या मुलीनं फोन कट केला आणि त्यानंतर तिचा फोन बंद लागला. काही दिवसांनी मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि विनाकपड्यातील व्हिडीओ त्याच्याकडे असल्याचा दावा केला. तसंच ५० हजार रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली,” अशी माहिती पीडित मुलानं दिली.

त्यानंतर दोघांमध्ये २२ हजार रूपये देण्याचं ठरलं. तसंच त्यानंतर पीडित मुलानं ऑनलाइन समोरच्या व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम टाकली. त्यानंतर पुन्हा त्याच्य़ाकडे पैसे मागण्यासाठी फोन आला. त्यावेळी आपल्याला गंडा पडल्याचं समजून पीडित मुलानं पोलिसांत तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 4:11 pm

Web Title: person strips for girlfriend whatsapp video call india bengaluru kerala jud 87
Next Stories
1 भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार, २०-२० कोटींना खरेदी केलं जातंय; अशोक गेहलोत यांचा आरोप
2 सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय; राजस्थानमधील सर्व समित्या केल्या बरखास्त
3 “उत्तम इंग्लिश बोलणं, हॅण्डसम दिसणं हेच सर्वकाही नसतं”, गेहलोत यांचा सचिन पायलट यांना टोला
Just Now!
X