News Flash

परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

लाहोर हायकोर्टाने परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्ऱफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निर्णय देत ती रद्द केली आहे. जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोह केल्याचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोरच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. ज्यानंतर लाहोर हायकोर्टाने ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

पत्रकार अब्दुल हक यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष न्यायलयाने दिलेले इतर आदेशही लाहोर कोर्टाने रद्द केले आहेत. विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षाच बेकायदा ठरवण्यात आल्याने ती रद्द झाली आहे असं अतिरिक्त अॅटर्नी जनलर इश्कियात ए खान यांनी म्हटलं आहे. १७ डिसेंबरला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना देशद्रोही ठरवलं. त्यानंतर पाकिस्तानी घटनेनुसार अनुच्छेद सहा अन्वये फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र अनुच्छेद सहा मध्ये करण्यात आलेल्या १८ व्या सुधारणेनंतर हा निर्णय देता येणार नाही असं लाहोर कोर्टाने म्हटलं आहे.

न्यायाधीश मुजाहीर अली नकवी यांच्या नेतृत्त्वात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुशर्रफ यांच्यासंबंधीचा निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णय अनियमितता आणि विरोधाभास यांचा समावेश आहे. कोर्टाचा निर्णय पूर्वग्रहदुषित आहे असंही लाहोर हायकोर्टाने म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 6:55 pm

Web Title: pervez musharraf death penalty canceled by lahore high court scj 81
Next Stories
1 “आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाशी भाजपाचा संबंध नाही”
2 ‘सरकारी भीक मिळाली नाही म्हणून…’; भाजपाचा अनुराग कश्यपवर पलटवार
3 VIDEO: … आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम
Just Now!
X