पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या हालचालींवर र्निबध घालण्यात आले आहेत. त्यांच्या फार्म हाऊसच्या दोन खोल्यांत  त्यांना स्थानबद्ध केले असून त्या घराला तुरुंगाचे स्वरूप देण्यात आले आहे.
मुशर्रफ यांना त्यांच्या वकिलांनाही भेटू दिले जात नसल्याची तक्रार त्यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे. मुशर्रफ यांनी २००७ मधल्या आणीबाणीत ६० न्यायमूर्तीना स्थानबद्ध केल्याप्रकरणी  इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच  हे र्निबध घालण्यात आले आहेत.