पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात दहशतवादविरोधी न्यायालयाने मंगळवारी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 
रावळपिंडीच्या न्यायालयातील सुनावणीवेळी मुशर्रफ यांनी तिथे उपस्थित राहावे, असे आदेश गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणांमुळे मुशर्रफ यांना न्यायालयात आणण्यात आले नव्हते. मुशर्रफ यांना सध्या त्यांच्या इस्लामाबादजवळ असलेल्या फार्म हाऊसवर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या फार्महाऊसचेच रुपांतर तात्पुरत्या कारागृहात करण्यात आले आहे. पुढील १४ दिवस त्यांना याच फार्महाऊसवर न्यायालयीन कोठडी भोगावी लागणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे.