News Flash

विशेष न्यायालयाच्या स्थापनेस आव्हान देण्याचा मुशर्रफ यांचा निर्णय

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालय स्थापन केले असून या निर्णयास आव्हान देण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी घेतला

| November 22, 2013 01:18 am

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालय स्थापन केले असून या निर्णयास आव्हान देण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयास आव्हान देण्यात येईल. विशेष न्यायालयातील न्यायाधीश पक्षपाती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेले तिन्ही न्यायाधीश मुशर्रफ यांच्या विरोधात असून त्यांच्याकडून योग्य न्याय मिळण्याची शक्यता वाटत नाही, असे ‘ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग’च्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी सांगितले. सदर निर्णयास आव्हान देणारी याचिका लवकरात लवकर दाखल करण्यात येईल, असेही इशाक यांनी नमूद केले. या तिन्ही न्यायाधीशांचा सर्व तपशील तसेच इतिहासही आम्हास चांगला ठाऊक असून त्यामुळेच मुशर्रफ यांच्याबद्दल पूर्वग्रह बाळगणाऱ्या अशा न्यायाधीशांचीच नियुक्ती सरकारने केल्यामुळे सरकारच्या एकूण मन:स्थितीची कल्पना येते, अशी टीका इशाक यांनी केली.
मुशर्रफ यांनी सन २००७ मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्यामुळे त्यासंदर्भात त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायालयात त्याच खटल्याची सुनावणी होईल. पाकिस्तानातील नामवंत वकील शरीफुद्दीन पीरझादा आणि इब्राहिम सात्ती यांनी इस्लामाबाद शहराच्या बाहेर असलेल्या मुशर्रफ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी पुढील व्यूहरचनेसंबंधी विचारविनिमय केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:18 am

Web Title: pervez musharraf to be tried for high treason pakistan interior minister
टॅग : Pervez Musharraf
Next Stories
1 मुझफ्फरनगर दंगलीतील विशिष्ट धर्माच्या पीडितांना भरपाई
2 दाभोळ प्रकल्पासाठी ऊर्जा खात्याचे पेट्रोलियम खात्याला साकडे
3 अफगाणिस्तानात १५ हजार परदेशी सैनिक राहू शकतात-करझाई
Just Now!
X